Breaking News

सिडकोच्या भुखंडास विक्रमी दर

ई-लिलाव प्रक्रियेद्वारे ऐरोली व वाशी येथील विक्रीस उत्तम प्रतिसाद

नवी मुंबई ः सिडको वृत्तसेवा

सिडको महामंडळातर्फे ई-लिलाव प्रक्रियेद्वारे ऐरोली व वाशी येथील पाच भूखंडांच्या विक्री करण्याच्या योजनेस निविदाकारांचा उत्तम प्रतिसाद लाभून सर्व भूखंडांची विक्रमी दराने विक्री करण्यात आली आहे. या विक्रीतून सिडको महामंडळाच्या तिजोरीत अंदाजे 229 कोटी रूपयांची भर पडली आहे.

योजना पुस्तिकेतील वेळापत्रकानुसार शुक्रवारी (दि. 06) सिडको भवन येथे संपूर्ण प्रक्रिया झाली. प्राप्त झालेल्या ई-निविदा निविदादारांच्या समोर ऑनलाईन माध्यमातून उघडण्यात आल्या व ई-लिलाव प्रक्रियेमधील बोलींची तुलना करण्यात येऊन यशस्वी निविदाकारांची नावे जाहीर करण्यात आली.

बंद निविदेमध्ये उद्धृत करण्यात आलेली बोली किंवा ई-लिलावामध्ये उद्धृत करण्यात आलेली बोली यांपैकी जी बोली जास्त रकमेची असेल ती बोली स्वीकारण्याचा निकष निश्चित करण्यात आला होता.

ई-लिलाव व ई-निविदा प्रक्रिये अंतर्गत अर्ज नोंदणी, अनामत रकमेचा भरणा, निविदा भरणे या सर्व प्रक्रिया सुलभ, पारदर्शक व जलद अशा ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात आल्या. बंद निविदा सादर करणार्‍या निविदाकारांनाच पुढील टप्प्यातील ई-लिलाव प्रक्रियेमध्ये सहभागी होता येणार होते.

महत्तम बोली

सर्व भूखंडांकरिता ई-लिलाव प्रक्रियेमध्ये उद्धृत करण्यात आलेली सर्वाधिक रकमेची बोली स्वीकारण्यात येऊन संबंधित अर्जदारांना यशस्वी म्हणून घोषित करण्यात आले. भूखंडांच्या आधारभूत दरांपेक्षा या बोली सरासरी दुपटीने अधिक आहेत. ऐरोली येथील भूखंड क्र. 17 करीता श्रीनाथजी ऑर्गनायझर्स प्रा. लि. यांच्यातर्फे उद्धृत करण्यात आलेली रु. 2,67,786 प्रति चौ. मी. ही महत्तम बोली ठरली.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply