ओवे (ता. पनवेल) हावम एज्युकेशन अॅण्ड सोशियल असोसिएशन आणि स्टार क्रिकेट क्लब यांच्या वतीने आमदार चषक 2019 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेला भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि जिल्हा सरचिटणीस आमदार महेश बालदी यांनी गुरुवारी भेट देऊन स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे तालुका अध्यक्ष व आयोजक मन्सूर पटेल, जिल्हा सरचिटणीस रय्यान तुंगेकर, नासीर शेख, इर्शाद शेख, जावेद पटेल, इम्तियाझ शेख, अफजल शेख, मुनाफ पटेल, निसार पटेल, मुश्ताक पटेल यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, क्रिकेटप्रेमी व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.