Breaking News

महाडमध्ये पाच मजली इमारत कोसळली

200 जण अडकल्याची भीती

महाड : येथील काजळपुरा भागातील पाच मजली इमारत कोसळल्याची घटना सोमवारी (दि. 24) सायंकाळी घडली. या इमारतीच्या ढिगार्‍याखाली 200 लोक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. जखमींना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ टीमला पाचारण करण्यात आले आहे.
ऑगस्ट महिना महाडसाठी पुन्हा एकदा घातक महिना ठरला आहे. महाड-मुंबई मार्गावरील काजळपुरा येथील तारिक गार्डन ही पाच मजली इमारत सोमवारी सायंकाळी 6च्या सुमारास पत्त्यासारखी कोसळली. 2011मध्ये बांधलेल्या या इमारतीमध्ये 47 फ्लॅट होते.
दुर्घटनास्थळी मदत व बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असून, जखमींना विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात येत आहे. स्थानिक लोक जखमींना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न करीत आहेत, मात्र यंत्रणेअभावी बचावकार्याला मर्यादा येत होत्या.

Check Also

कर्जतमध्ये तिहेरी हत्याकांड

जमिनीच्या वादातून कुटुंबातील तिघांचा खून; संशयित तरुण पोलिसांच्या ताब्यात कर्जत, नेरळ : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील …

Leave a Reply