Monday , January 30 2023
Breaking News

खंडित इंटरनेटमुळे नेरळची युनियन बँक ‘आऊट ऑफ कव्हरेज’

कर्जत : बातमीदार

इंटरनेट सेवा गेल्या 10 दिवसांपासूनपासून बंद असल्याने युनियन बँकेच्या नेरळ शाखेचा कारभार पुन्हा एकदा ठप्प झाला आहे. त्यामुळे बँकेचे खातेदार आणि पेन्शनर हे संतापले आहेत.

 युनियन बँकेच्या नेरळ शाखेत तब्बल 30 हजार खातेदार आहेत. त्यापैकी 10 हजारहुन अधिक करंट खाती असून, या नेरळमधील एकमेव राष्ट्रयीकृत बँकेत येथील सर्व व्यापार्‍यांची खाती आहेत. मात्र इंटरनेट सेवा सतत बंद असल्याने या बँकेचे खातेदार मोठ्या प्रमाणात अन्य बँकांकडे वळले आहेत.

पेन्शनवर अवलंबून असलेले वयोवृद्ध आपल्या खात्यातील पेन्शनची रक्कम काढण्यासाठी दर महिन्याच्या 1तारखेपासून युनियन बँकेबाहेर बाहेर गर्दी करतात. बँकेच्या आऊट ऑफ कव्हरेज नेटवर्कचा या ज्येष्ठ नागरिकांना मोठा फटका बसत आहे. तासंतास बँकेबाहेर ताटकळूनही त्यांना पैसे मिळत नसल्याने त्यांची मोठी फरफट होत आहे. युनियन बँकेच्या ठाणे येथील विभागीय कार्यालयाने नवीन इंटरनेट सेवा घेण्यासाठी यंत्रणा उपलब्ध केली आहे. मात्र ही यंत्रणा अजून कार्यान्वित झाली नसल्याने बीएसएनएल वरच बँकेची नेरळ शाखा अवलंबून आहे. मात्र बँकेच्या आऊट ऑफ कव्हरेज कामाविषयी संताप व्यक्त केला जात आहे.

युनियन बँक ही नेरळमधील पहिली राष्ट्रीयकृत बँक आहे.  या बँकेत आम्ही पुर्वीपासून खातेदार आहोत. मात्र बँकेतील इंटरनेट कायम गुल असते. त्यामुळे आमच्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. सोमवारपर्यंत जर बँकेचे कामकाज सुरळीत झाले नाही, तर आम्ही या बँकेस टाळे ठोकू.

-अरविंद कटारिया, व्यापारी, नेरळ

रस्त्याचे काम करताना ठेकेदाराकडून बीएसएनएलच्या वाहिन्या तुटल्या आहेत, असे बीएसएनएलने सांगितले आहे. त्यामुळे केवळ आमच्या शाखेचीच नाही, तर सगळीकडे इंटरनेट सेवा बंद आहे. यामुळे ग्राहकांची गैरसोय होत आहे. मात्र बँकेचे कामकाज पूर्णपणे ठप्प नसून ग्राहकांना थोडेथोडे करून पैसे दिले जात आहेत. सोमवारपर्यंत इंटरनेट सेवा सुरळीत होऊन बँकेचे कामकाज व्यवस्थित होईल.

-अदिती म्हात्रे, व्यवस्थापक, युनियन बँक, नेरळ शाखा                      

Check Also

माथेरानकर अनुभवणार सुलभ, स्वस्त प्रवास

ई-रिक्षाच्या सुविधेमुळे पर्यटकांसह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण माथेरान : रामप्रहर वृत्त दहा वर्षांपूर्वी नगरपरिषदेच्या तत्कालीन लोकप्रतिनिधीनी …

Leave a Reply