Monday , January 30 2023
Breaking News

नेरळमध्ये सत्ताधारी शिवसेनेला धक्का

उपसरपंचपदी शंकर घोडविंदे

कर्जत : बातमीदार

नेरळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत खांडा विकास आघाडीचे सदस्य शंकर घोडविंदे विजयी झाले. त्यांनी शिवसेनेचे धर्मानंद गायकवाड यांचा 10 विरुद्ध 8 मतांनी पराभव केला.

नेरळ ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदासाठी गुरुवारी (दि. 5)  निवडणुक घेण्यात आली. अध्यासी अधिकारी ग्रामपंचायतचे सरपंच रावजी शिंगवा यांच्याकडे निर्धारित वेळेत धर्मानंद गायकवाड आणि शंकर घोडविंदे यांचे नामांकन अर्ज शिल्लक राहिल्याने दुपारी दोन वाजता उपसरपंच पदासाठी निवडणुक घेण्यात आली. ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीत भाजप बरोबर असलेली युती तोडून शिवसेनेने स्वतःच्या ताकदीवर उपसरपंच पदाची निवडणूक लढविली होती. मात्र त्यात शिवसेनेला अपयशाचा धक्का बसला.

Check Also

माथेरानकर अनुभवणार सुलभ, स्वस्त प्रवास

ई-रिक्षाच्या सुविधेमुळे पर्यटकांसह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण माथेरान : रामप्रहर वृत्त दहा वर्षांपूर्वी नगरपरिषदेच्या तत्कालीन लोकप्रतिनिधीनी …

Leave a Reply