Breaking News

अश्विनी बिद्रे हत्याकांडप्रकरणी आरोपींच्या वकिलांना आठ हजारांचा दंड

पनवेल ः बातमीदार

अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात शुक्रवारी (दि. 6) झालेल्या सुनावणीत आरोपीचे वकील अ‍ॅड. भानुशाली गैरहजर राहिल्याने आरोपीच्या वकीलांनी पुढील तारीख मागितली, मात्र विशेष सरकारी वकील अ‍ॅड. प्रदीप घरत यांनी आक्षेप घेऊन साक्षीदार हे साक्ष देण्यासाठी चेन्नईवरून येत असून त्यांचा वेळ आणि पैसा खर्च होत असल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे न्या. राजेश अस्मर यांनी आरोपीच्या वकिलांची कानउघाडणी करून आनंद बिद्रे यांना दंड व भत्ता म्हणून आठ हजार रुपये देण्याचे आदेश दिले. पनवेल सत्र न्यायालयात अश्विनी बिद्रे हत्याकांडाची सुनावणी सुरू असून न्यायालयाकडून साक्षीदार तपासण्यास सुरुवात झाली आहे. पहिलीच साक्ष अश्विनी बिद्रे यांचे बंधू आनंद बिद्रे यांची सुरू करण्यात आली असून सध्या आरोपीच्या वकिलाकडून आनंद बिद्रे यांची उलटतपासणी सुरू आहे. शुक्रवारी आनंद बिद्रे यांची उलटतपासणीची साक्ष पूर्ण होणार होती, मात्र आरोपीचे वकील अ‍ॅड. भानुशाली शुक्रवारच्या सुनावणीदरम्यान गैरहजर राहिले. त्यामुळे त्यांच्या पश्चात हजर असलेल्या आरोपीच्या वकिलांनी पुढील तारखेची मागणी केली, मात्र या वेळी विशेष सरकारी वकील अ‍ॅड. प्रदीप घरत यांनी याला आक्षेप घेऊन साक्षीदार हे साक्ष देण्यासाठी चेन्नई येथून येत असून त्यासाठी त्यांचा वेळ आणि पैसा खर्च होत असल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे न्या. राजेश अस्मर यांनी याची दखल घेऊन आरोपीच्या वकिलांची कानउघाडणी केली. तसेच आरोपीच्या वकिलांनी दंड व भत्ता म्हणून आठ हजार रुपये आनंद बिद्रे यांना देण्याचे आदेश दिले. त्यानुसार आरोपीच्या वकिलांना आनंद बिद्रे यांना न्यायालयासमोर आठ हजार रुपये द्यावे लागले. या हत्याकांडाची पुढील सुनावणी 19 डिसेंबर रोजी आहे.

Check Also

पनवेल कोळीवाड्यात आई एकविरा मातेचे तैलचित्र, सभामंडप, सेल्फी पॉईंटचा शुभारंभ; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त आई एकविरा मातेचे तैलचित्र, सेल्फी पॉईंट आणि सभामंडप पनवेल कोळीवाड्याची शान …

Leave a Reply