Breaking News

गव्हाणमध्ये घरांवर कारवाईसाठी आलेले सिडको पथक नरमले

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्पग्रस्तांची एकजूट

पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील गव्हाण गावात प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेल्या घरांवर कारवाई करण्यासाठी शुक्रवारी (दि. 23) आलेल्या सिडकोच्या पथकाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत विरोध करण्यात आला. प्रकल्पग्रस्तांचा आक्रमक पवित्रा पाहून सिडकोने आपली कारवाई थांबवली आणि जोपर्यंत गरजेपोटी बांधलेल्या घरांचा निर्णय होत नाही तोपर्यंत प्रकल्पग्रस्तांच्या कोणत्याही घराला हात लावणार नाही, अशी ग्वाही सिडको अधिकारी भरत ठाकूर यांनी दिली.
या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी, सिडकोने दिलेल्या नोटीसांचे उत्तर प्रकल्पग्रस्तांनी दिले असतानाही ते कारवाई करण्यासाठी आले होते. सिडको प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांनी दिलेले उत्तर समजून घ्यावे तसेच यापुढे गरजेपोटी बांधलेल्या घरांवर कारवाई करण्यापूर्वी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींसोबत बैठकीचे आयोजन करून या विषयावर चर्चा करावी, अशी सूचना सिडको अधिकार्‍यांना केली.
सिडकोला विरोध दर्शवताना भाजपचे ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल भगत, विधानसभा निरीक्षक रूपेश पाटील, माजी पं.स. सदस्य भाऊशेठ पाटील, न्हावे ग्रामपंचायतीचे सरपंच विजेंद्र पाटील, गव्हाणचे माजी उपसरपंच विजय घरत, वहाळचे उपसरपंच अमर म्हात्रे, व्हावे ग्रामपंचायत सदस्य सागरशेठ ठाकूर, सी.एल. ठाकूर, तालुका चिटणीस जयवंत देशमुख, वामनशेठ म्हात्रे, कामगार नेते रवी नाईक, उलवे नोड 1 अध्यक्ष निलेश खारकर, उद्योजक मनोज आंग्रे, सदानंद देशमुख, शैलेश भगत, सुहास भगत, कमळाकर देशमुख, योगिता भगत, निकिता खारकर, धीरज ओवळेकर, विनायक कोळी, किरण देशमुख, पी.ए. कोळी यांच्यासह सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply