पनवेल ः नवभारतीय शिव वाहतूक संघटनेच्या रायगड जिल्हा चिटणीसपदी साईचरण म्हात्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी साईचरण म्हात्रे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या वेळी भाजपचे वाहतूक सेलचे महाराष्ट्र उपाध्यक्ष निर्गुण कवळे, जयंत पाटील, राजेश पाटील, सुरज ठाकूर, संदीप म्हात्रे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन
पनवेल : चिपळूण येथे नुकतीच जिज्ञासा 2019 ही राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन स्पर्धा झाली. या स्पर्धेत रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला असून, त्यांच्या प्रतिकृतीची निवड देशपातळीवर झाली आहे. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका स्वप्नाली म्हात्रे यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
ग्रामीण संघांसाठी एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
पाले खुर्द (ता. पनवेल) : श्री गणेश क्रिकेट संघाच्या वतीने ग्रामीण संघांसाठी एकदिवसीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेस भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी शनिवारी भेट देत खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. या वेळी पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, आयोजक सागर भोईर, गौरव भोईर, सचिन गुर्गे, दिनेश काठावले आदी उपस्थित होते.
शशिकांत ठाकूर यांच्या नवीन घराची वास्तुशांती व श्री सत्यनारायणाची महापूजा
उलवे नोड ः शिवाजीनगर येथे सुरक्षा शशिकांत ठाकूर यांच्या नवीन घराच्या वास्तुशांती व श्री सत्यनारायणाच्या महापूजेनिमित्त पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत व माजी नगरसेविका कल्पना ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या.