रोहा ः प्रतिनिधी
शहरातील आडवी बाजारपेठेतील रजनीशेठ शहा यांचे जुन्या लाकडी घराला सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास आग लागली असून ही आग विझविण्यासाठी धाटाव एमआयडीसी अग्निशमन दलाने शर्तीचे प्रयत्न करून आग रात्री उशीरापर्यंत आटोक्यात आणली आहे. या आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले असून लाखो रूपयाचे नुकसान झाले आहे. आगीचे लोळ मोठ्या प्रमाणात बाहेर येत असल्याने या परिसरातील नागरिक भयभीत झाले होते. सुदैवाने या आगीत कोणतेही जीवीत हानी झाली नाही.