Breaking News

पनवेलमध्ये कोविड रुग्णालयात मार्गदर्शन आणि मानसिक समुपदेशन

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल येथील कोविड रुग्णालय तथा उपजिल्हा रुग्णालय येथे कोविडविषयी मार्गदर्शन आणि मानसिक समुपदेशन सत्राचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या वेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. बसवराज लोहारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुचिता गवळी, डॉ. राजपूत, डॉ. प्रमोद पाटील आणि इतर वैद्यकीय अधिकारी सह नर्सिंग स्टाफ व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते. या सत्राचे प्रमुख वक्ते जिल्हा मानसोपचार तज्ञ डॉ. अमोल बाळासाहेब भुसारे यांनी कोरोना आजार आणि मानसिक समुपदेशन यावर मार्गदर्शन करताना रुग्णांची व त्यांच्या नातेवाइकांची मानसिक स्थिती, रुग्णांशी कसे बोलावे, कोणती माहिती द्यावी, त्यासोबतच रुग्णांसोबतचा संवाद यावर लक्ष द्यावे, असे आवाहन केले. कोरोनाचे संकट सुरू झाल्यापासून अखंडपणे 24 तास सेवा देणारे रुग्णालय, त्या रुग्णालयातील सर्व कर्मचारी वर्ग आणि वैद्यकीय अधिकारी यांच्यावर शारीरिक आणि मानसिक आलेला तणाव, याविषयी डॉ. भुसारे यांनी सखोल मार्गदर्शन केले. उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बसवराज लोहारे यांनी मनोगतात सर्व कर्मचारी खूप चांगल्या पद्धतीने या आजाराला रोखण्याचे कार्य करीत आहेत, असे सांगून उपस्थित सर्वांचे आभार मानले.

Check Also

वायू-जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यस्तरीय समिती; आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्यातील वायू व जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांकडून घेतली जाणारी …

Leave a Reply