Breaking News

पिस्टलच्या दस्त्याने पोलीस कर्मचार्याला मारहाण, पोलीस उपनिरीक्षकावर 15 दिवसाने गुन्हा दाखल

अलिबाग : प्रतिनिधी

ड्युटी लावण्यावरून पोलीस उपनिरीक्षक यांना आलेल्या रागातून हजेरी मास्टरवर पिस्टलचा दस्ता मारून जखमी केल्याची घटना अलिबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत 19 फेब्रुवारी रोजी रात्री घडली होती. याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक अश्विन जाधव यांच्याविरोधात 15 दिवसानंतर भांदवी कलम 307 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे  अश्विन जाधव यांना लवकरच अटक केली जाणार आहे. पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार जिल्हा मुख्यालयात असणार्‍या रिजर्व पोलिसांची आरोपी कैदी पार्टी नेण्यासाठी ड्युटी लावली जाते. रिजर्व पोलीस दलाच्या निरीक्षकांनी 20 फेब्रुवारीसाठी  पोलिसांची ड्युटी लावली होती. पोलीस निरीक्षकांनी दिलेल्या यादीनुसार हजेरी मास्टर मंगेश निगडे यांनी उपनिरीक्षक अश्विन जाधव यांना ड्युटी लावली असल्याचे कळविले. याचा राग अश्विन जाधव यांना आला होता. उपनिरीक्षक अश्विन जाधव यांना ड्युटीची कल्पना दिल्यानंतर हजेरी मास्टर मंगेश निगडे यांनी 19 फेब्रुवारी रोजी ड्युटी लावलेल्या पोलिसांना सोडायचे का, हे विचारण्यासाठी रात्री 8 वाजता जिल्हा डीएसीबी शाखेकडे जाण्यास निघाले होते. हिराकोट तलावाजवळ निगडे व त्यांचा सहकारी आले असता, अश्विन जाधव यांनी त्यांना अडवून ड्युटी लावण्याबाबत विचारणा केली. त्यावेळी निगडे यांनी  सदर ड्युटी वरिष्ठांच्या आदेशाने लावल्याचे सांगितले. मात्र डोक्यात राग घेऊन आलेले जाधव यांनी निगडे यांना शिवीगाळ करून आपल्या जवळील पिस्टल काढून त्यात गोळ्या भरून तुला आता गोळ्याच घालतो असे सांगून त्याच्या अंगावर धरले होते. या झटापटीत जाधव यांनी निगडे यांच्या डोक्यावर पिस्टलच्या दस्त्याने मारहाण केली होती. त्यात जखमी झालेल्या निगडे यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. या घटनेनंतर पोलिसांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला नव्हता. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी जाधव यांची खातेनिहाय चौकशी लावून त्यांना निलंबित केले होते. मात्र निगडे यांच्यावर हल्ला केल्याबाबत 15 दिवसानंतर पोलीस उपनिरीक्षक अश्विन जाधव यांच्यावर 307 अन्वये अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply