Breaking News

बास्केटबॉलपटू सतनाम निलंबित

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन (एनबीए) लीगमध्ये सहभागी झालेला भारताचा पहिला बास्केटबॉलपटू हा बहुमान मिळवणारा सतनाम सिंग भामरा उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी आढळला आहे. त्यामुळे उत्तेजक द्रव्य प्रतिबंधात्मक संस्थेतर्फे (नाडा) त्याच्यावर तात्पुरत्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

गेल्या महिन्यात बंगळुरू येथे झालेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेच्या सराव शिबिरादरम्यान 23 वर्षीय सतनामची उत्तेजक चाचणी घेण्यात आली होती. ‘नाडा’ने जाहीर केलेल्या निवेदनपत्रात सतनामच्या चाचणीविषयी सखोल माहिती दिली. ‘11 नोव्हेंबर रोजी झालेल्या मूत्र चाचणीच्या नमुन्यात सतनाम दोषी आढळला असून, त्याच्या निलंबनाचा काळ 19 नोव्हेंबरपासून सुरू झाला आहे. उत्तेजक प्रतिबंधक शिस्तपालन समितीनेही त्याला दोषी ठरवल्यास त्याच्यावरील बंदीचा काळ किमान चार वर्षे लांबू शकतो,’ असे त्यामध्ये नमूद आहे, मात्र सतनामने पुन्हा एकदा चाचणी घेण्याऐवजी यासंबंधी उत्तेजक प्रतिबंधक शिस्तपालन समितीकडे दाद मागितली आहे आणि त्याच्यावर लादण्यात आलेले तत्काळ निलंबनही स्वीकारले आहे.

सतनामवर लादण्यात आलेल्या निलंबनाविषयी आम्हाला काहीही कल्पना नसून 15 डिसेंबरनंतरच आम्ही याविषयी आमचे मत कळवू. ‘नाडा’ने आम्हाला कल्पना न देता सतनामलाच थेट बंदीचे पत्र पोहचवल्यामुळे आमची एक प्रकारे फसवणूक केली आहे.

-चंदेर मुखी शर्मा, सचिव,

भारतीय बास्केटबॉल महासंघ

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply