Breaking News

पोलीस मित्र संघटनेच्या नवी मुंबई शाखा व कार्यकारिणीचे उद्घाटन

पनवेल ः वार्ताहर

पोलीस मित्र संघटना, महाराष्ट्र राज्य संघटनेच्या नवी मुंबई जिल्हा शाखा व कार्यकारिणीचे उद्घाटन, तसेच रायगड कार्यकारिणीच्या नियुक्त्या व पोलीस दलातील अधिकार्‍यांचा सत्कार असा कार्यक्रम पार पडला. यावेळी संघटनेचे संस्थापक व राज्य अध्यक्ष राजेंद्र कपोते व नवी मुंबई रायगड जिल्हा अध्यक्ष रूपेश पाटील यांच्या हस्ते 40 पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. सामाजिक, राजकीय क्षेत्रातील, तसेच पत्रकार, वकील अशा क्षेत्रातील तरुणांची फौज संघटनेत सामील करण्यात आली आहे. संघटना यांच्याद्वारे पोलिसांचे मित्र म्हणून जनता ते पोलीस यांच्यातील दुआ म्हणून काम करणार आहेत.

रूपेश पाटील हे नवी मुंबई व रायगडसाठी जिल्हा अध्यक्ष म्हणून कार्य करीत आहेत. त्यांना सोबत म्हणून नव्या मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते दीपक दळवी यांची नवी मुंबई जिल्हा संघटक म्हणून निवड या वेळी राज्य कमिटीचे मिलिंद चौधरी, नवी मुंबई संपर्क प्रमुख सुमित दरंदले यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

या वेळी पोलीस दलातील काही विशेष कार्य करणार्‍या अधिकार्‍यांचा सत्कार सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला. नवी मुंबईत काही दिवसांत अनेक सामाजिक कार्य घेऊन संघटनेच्या कार्याला सुरुवात करण्यात येईल, असे नवी मुंबई जिल्हा कार्यकारिणीकडून सांगण्यात आले. कार्यक्रमाला कोकण विभागातून, तसेच पुणे जिल्हा अध्यक्ष जाधव व पुणे कार्यकारिणी उपस्थित राहिली.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply