पनवेल : रामप्रहर वृत्त
जोपर्यंत झोपडपट्ट्यांचे सुयोग्य पुनर्वसन होत नाही तोपर्यंत एकाही झोपडीला हात लावू दिला जाणार नाही, असे भाजप नगरसेवकांनी आश्वस्त केले आहे. रेल्वे व सिडको अधिकार्यांनी प्रभाग क्र. 17 व प्रभाग क्र. 20, मालधक्का झोपडपट्टी, रेल्वेस्थानक मार्ग येथील झोपडपट्ट्यांच्या
सर्व्हेला सुरुवात केली आहे. भाजप नगरसेवक व पदाधिकार्यांनी तेथे जाऊन झोपडीधारकांचे म्हणणे ऐकून घेतले आणि त्यांना आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे सांगितले.
रेल्वे प्लॅटफॉर्मपासून 29 मीटर हद्दीतील झोपड्यांचा सर्व्हे करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मालधक्का झोपडीधारकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी नगरसेवक प्रकाश बिनेदार, अजय बहिरा, अॅड. मनोज भुजबळ, तेजस कांडपिळे, नगरसेविका चारुशीला घरत, सुशिला घरत, अॅड. वृषाली वाघमारे, भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते जगदिश घरत आदींनी तेथे भेट देऊन पाहणी केली. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याशी संपर्क साधून त्यांना याची कल्पना देण्यात आली. या सर्व्हेवेळी भाजप कार्यकर्ते राजू बगाटे, मच्छिंद्र झगडे, पोपट मुगसे, नंदा टापरे, सतीश बोरुडे, अनुसूचित जाती मोर्चा पनवेल तालुका उपाध्यक्ष रावसाहेब खरात, शहर सरचिटणीस राहुल वाहुळकर व मालधक्का झोपडीधारक उपस्थित होते.