Breaking News

मुंबई पूणे द्रूतगती मार्गावरील अपघातात एक ठार; एक गंभीर जखमी

खोपोली : प्रतिनिधी – टेम्पोचे नियंत्रण सुटल्याने भरधाव टेम्पो  दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात चालक अनिल अशोक भांडवलकर गंभीर जखमी झाला असून टेम्पोमध्ये असलेला कामगार सोपान नामदेव जाधव (46) याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

हा अपघात मुंबई पूणे द्रूतगती मार्गावर खोपोली बाह्यमार्गाजवळ मंगळवारी रात्री घडला. टेम्पो  चालक  अनिल  त्यांच्या ताब्यातील  टेम्पोमध्ये कात्रज पुणे येथून प्रवीण लोणच्याचे बॉक्स माल भरून भिवंडी येथे पोच करण्यासाठी मंगळवारी रात्री निघाला होता. मुंबई पूणे द्रूतगती मार्गाने जात असताना रात्री सव्वा एकच्या दरम्यान  खोपोली बाह्यमार्गा जवळ आले असताना अनिल यांना दुभाजकाचा अंदाज न आल्याने टेम्पोची जोरदार धडक दुभाजकाला बसली.

वेगात असलेला टेम्पो पलटी होवून चालक अनिल व सोबतचा कामगार सोपान जाधव गंभीर जखमी झाले.  त्यांना उपचारासाठी पवना हॉस्पिटल सोमाटने फाटा तळेगाव येथे दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान सोपान जाधव याचा मृत्यू झाला असून अनिलची प्रकृती चिंताजनक आहे. अपघाताची नोंद खोपोली पोलीस ठाणे येथे  करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक फौजदार श्रीरंग किसवे हे करीत आहेत.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply