पनवेल ः तालुका आणि परिसरात क्रिकेटच्या भव्य सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत नावडे येथे आमदार चषक आणि कळंबोली येथे सभागृहनेते चषक 2019 तसेच हावामा एज्युकेशन अॅण्ड सोशियलअसोशिएशन तसेच स्टार क्रिकेट क्लब यांच्या वतीने ओवे येथे क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या क्रिकेट सामन्यांस पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी रविवारी भेट देत खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. या वेळी नगरसेवक नितीन पाटील, ओवे येथील क्रिकेट सामन्यांचे आयोजक तथा भाजप नेते मनसुर पटेल, सभागृह नेते चषक 2019 स्पर्धेचे आयोजक प्रशांत खानावकर, उमेश खानावकर, महेश म्हात्रे, किरण पाटील आदी उपस्थित होते.