
उरण : वार्ताहर
यूईएस स्कूल, ज्युनिअर अॅण्ड सीनिअर कॉलेजमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव जल्लोषात साजरा झाला. या वेळी विद्यार्थ्यांचे क्रीडागुण पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पालक उपस्थित होते. त्यांनी तसेच प्रमुख पाहुणे व उपस्थितांनी खेळगुणांना भरभरून दाद दिली.
क्रीडा महोत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल दामगुडे उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष तनसुख जैन यांनी त्यांचे स्वागत केले. उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, मानद सचिव आनंद भिंगार्डे, विश्वस्त सदस्य व माजी प्राचार्या स्नेहल प्रधान, विश्वस्त सदस्य व माजी अध्यक्ष अॅड. राजेंद्र भानुशाली आणि पीटीए सदस्य हजर होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विठ्ठल दामगुडे यांनी आपल्या भाषणातून खेळाचे जीवनातील महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले व सर्व विजयी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. क्रीडा महोत्सवाच्या पारितोषिक समारंभात विजयी विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे तसेच उपस्थित मान्यवरांकडून पदक व प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले. विजयी ठरलेल्या ’प्रतापगड हाऊस’ला ढाल देण्यात आली. पुरुष व महिलांच्या क्रिकेट स्पर्धेतील विजयी संघांनाही रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.