Breaking News

समाजोपयोगी उपक्रमांनी वाढदिवस साजरा

पनवेल : रामप्रहर वृत्त

उलवे येथील सामाजिक कार्यकर्ते किरण मढवी यांनी आपला मुलगा वरद याचा पाचवा वाढदिवस विविध उपक्रम राबवून साजरा केला. त्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे. समाजाचे आपण देणेकरी लागतो या भावनेने आणि समाजसेवा हीच खरी ईश्वरसेवा मानून किरण मढवी यांनी उलवे येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील इयत्ता आठवी, नववी व दहावीच्या 31 गरीब, गरजू विद्यार्थ्यांना वरद याच्या वाढदिवसानिमित्त दत्तक घेतले आहे. त्या विद्यार्थ्यांची चालू वर्षासाठी लागणारी प्रवेश फी, परीक्षा फी तसेच शालेय गणवेश आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे वेश्वी ग्रामपंचायत हद्दीतील एकवीरा माता मंदिराजवळ असलेल्या मोकळ्या परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली. वेश्वी येथील कातकरी वाडीतील 70 कुटुंबांना किमान दोन आठवडे पुरेल इतके धान्य, कडधान्य वाटप करण्यात आले. उलवे नोडच्या सेक्टर 24 येथे भरविण्यात येत असलेली कोंबडभुजे अंगणवाडी-2 ही डिजिटल करण्यासाठी या अंगणवाडीला प्रोजेक्टर व स्क्रीन देण्यात आली. याखेरिज उलवे, तरघर, कोंबडभुजे-1, कोंबडभुजे-2 आणि गणेशपुरी अशा पाच अंगणवाड्यांतील मुलांना खाऊ व खेळणी वाटप करण्यात आली. या सेवाभावी कार्यासाठी वेश्वी ग्रामपंचायतीचे सरपंच अजित पाटील, उपसरपंच हेमंत कोळी, ग्रामपंचायत सदस्य किरण मढवी, हेमल मढवी, काशिनाथ खारपाटील तसेच संदीप पाटील, सामाजिक कार्यकर्ते सुनील ठाकूर, शिवसंघर्ष प्रतिष्ठानचे अध्यक्ष अखिल यादव, आदर्श शिक्षक मो. का. मढवी गुरुजी, बेलवलीचे दिनेश पाटील, उलवे ग्रामपंचायतीच्या सरपंच कविता खारकर, स्कूल कमिटी चेअरमन शरद खारकर, धनेश पारकर, अविनाश धुमाळ आणि किरण मढवी मित्रपरिवार आदी उपस्थित होते.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply