Breaking News

ब्रह्मचैतन्य मासिक संगीत सभा उत्साहात

मिलिंद गोखले यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध

खांदा कॉलनी : रामप्रहर वृत्त

कलाप्रेमी ’सूर निरागस हो’ या समूहाच्या वतीने ब्रह्मचैतन्य मासिक संगीत सभेचा दुसरा कार्यक्रम पनवेल येथील श्री गोंदवलेकर महाराजांच्या मठात उत्साहात झाला. या वेळी नवीन पनवेल येथील ज्येष्ठ गायक मिलिंद गोखले यांचे गायन झाले. गोखले यांनी राग मधुवंतीने मैफलीला प्रारंभ केला. त्यानंतर त्यांनी विलंबित व द्रुत बंदिश सादर करून वातावरणनिर्मिती केली. नंतर एक ठुमरी पेश करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. मग विविध अभंग, रामभजन, नाट्यगीत आदी प्रकारांचे स्वरभावपूर्ण सादरीकरण करून गीतरामायणातील गा बाळांनो श्रीरामायण या भैरवीने मैफलीची सांगता केली. ंगीत अलंकार नंदकुमार कर्वे यांनी संवादिनी व युवा वादक आदित्य उपाध्ये व गिरीश घाणेकर यांनी तबलासाथ, तर हर्षल पाटील यांनी पखवाजसाथ केली.  या कार्यक्रमाला पं. जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य डॉ. मोहन दरेकर व प्रसिद्ध तबलावादक पं. किशोर पांडे यांच्यासह पनवेलकर रसिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. ’सूर निरागस हो’ समूहाचे संस्थापक गिरीश घाणेकर, किरण बापट यांच्यासह मिलिंद काळेले, पंढरीनाथ पाटील, चंद्रकांत मने, अतुल जोशी, देवेन मराठे, मेघा इंगळे, विनायक प्रधान, कीर्तनकार हर्षदबुवा मांजरेकर या सभासदांनी ही संगीत सभा बहारदार करण्यासाठी मोलाचे योगदान दिले.

Check Also

नमो चषक महोत्सवाचा शनिवारी पारितोषिक वितरण सोहळा

माजी क्रिकेटपटू तथा प्रशिक्षक दिलीप वेंगसरकर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त लोकप्रिय पंतप्रधान …

Leave a Reply