Tuesday , February 7 2023

शेडवली रस्ता बनला धोकादायक, खड्ड्यामुळे नागरिक हैराण

खोपोली : प्रतिनिधी

नगरपालिका हद्दीमधील शेडवली परिसरातील रस्त्यांवरील डांबर उखडून  मोठमोठे  खड्डे पडले आहेत. त्यामुळे संपूर्ण रस्ता धोकादायक झाला  असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. रस्त्यांवर मोठेमोठे खड्डे पडल्याने वाहतुकीस आणि रहदारीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे.

खोपोली नगरपालिका हद्दीतील शेडवली परिसर विकासाच्या दिशेने वाटचाल करीत असताना विविध नागरी समस्यांनी नागरिक बैचन आहेत. शेडवली मुख्य रस्त्याची दुर्दशा झाल्याने येथून प्रवास करणे सर्वाना जिकरीचे बनले असून, संपूर्ण रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने रस्ता धोक्याची घंटा देत आहे. यामुळे पादचारी आणि वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. या मार्गावर चारचाकी वाहने, रिक्षा, टेंम्पो, दुचाकी वाहने यांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे नागरिकांची होणारी अडचण लक्षात घेऊन रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी सध्या जोर धरु लागली आहे.

शेडवली रस्त्याच्या दूरावस्थेमुळे शाळेत जाणार्‍या मुलांसह पादचारी व वाहन चालकांसाठी हा मार्ग धोकादायक बनला आहे. येथून माणकीवली परिसरातील स्टोन क्रेशरच्या ओव्हरलोड वाहतूकीमुळेही रस्त्यावर धुरळा उडत आहे. या ओव्हरलोड वाहनांचा मार्ग बदलण्याची गरज आहे. -चंद्रकांत फावडे, ग्रामस्थ, शेडवली-खोपोली

Check Also

नवी मुंबई ते मुंबई आता फक्त 50 मिनिटांत

बेलापूर-गेटवे वॉटर टॅक्सी सेवा सुरू नवी मुंबई : प्रतिनिधी बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया …

Leave a Reply