Breaking News

गव्हाण कोपरमध्ये शासकीय दाखले वाटप शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल ः रामप्रहर वृत्त
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या मागणीनुसार पनवेल तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागात शासकीय दाखले वाटप शिबिरांचा उपक्रम राबविण्यात आला. या अंतर्गत मंगळवारी (दि. 12) गव्हाण कोपर येथील छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शिबिरालाही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिराचे उद्घाटन भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सदस्य व महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष रत्नप्रभा घरत, भाजपचे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, चिटणीस जयवंत देशमुख, ज्येष्ठ नेते वसंत पाटील, अजय भगत, वामन म्हात्रे, गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, उलवे नोड-2 उपाध्यक्ष अनंता ठाकूर, रतन भगत, श्रीधर भगत, वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे, कोळी समाजाचे नेते विश्वनाथ कोळी, उलवे नोड-1 अध्यक्ष मदन पाटील, कोपर अध्यक्ष सुधीर ठाकूर, न्हावे ग्रामपंचायत सदस्य हरेश म्हात्रे, किशोर पाटील, राकेश गायकवाड, हरिश्चंद्र म्हात्रे, नामदेव ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य योगिता भगत, कामिनी कोळी, सुनिता घरत, उषा देशमुख, सुजाता पाटील, स्नेहलता ठाकूर, सुहास भगत, दीपक गोंधळी, बी. टी. कांबळे, नामदेव ठाकूर, आशिष घरत, ग्रामसेवक एम. डी. पाटील, मंडळ अधिकारी पी. एम. नाईक, तलाठी श्री. सावंत यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. रेशनकार्ड, उत्पन्न दाखला, जातीचा दाखला, डोमिसाईल, आधार कार्ड, वय व अधिवास अशा विविध शासकीय दाखल्यांसाठी विद्यार्थी व नागरिकांना पनवेल तहसील कार्यालयात फेर्‍या माराव्या लागतात. अशा परिस्थितीत वेळ आणि आर्थिक भुर्दंड पडत असतो. नागरिकांचा हा त्रास वाचविण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, नगरसेवक हरेश केणी व नगरसेवक बबन मुकादम यांनी तहसीलदार विजय तळेकर यांची भेट घेऊन शासकीय दाखले वाटप शिबिर आयोजित करण्याची मागणी केली होती. या मागणीनुसार ग्रामीण व शहरी भागात सहा ठिकाणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले. त्या अनुषंगाने खारघर, सुकापूर, कळंबोली, आजिवली, कामोठे येथे यापूर्वी दाखले वाटप शिबिर झाले. त्याचप्रमाणे मंगळवारी गव्हाण कोपर येथील छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये दाखले वाटप शिबिर झाले. या शिबिरात रेशनकार्ड, उत्पन्नाचा दाखला, डोमिसाईल, वय व अधिवास दाखला, रहिवासी दाखला, जातीचा दाखला, शालेय विद्यार्थ्यांसाठी आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती आदी सुविधांचा नागरिकांना लाभ मिळाला. खारघर, सुकापूर, कळंबोली, आजिवली, कामोठे, गव्हाण या सहा ठिकाणी झालेल्या शिबिरांमध्ये हजारो नागरिकांनी लाभ घेतला असून त्याबद्दल नागरिकांनी आमदार प्रशांत ठाकूर व तहसील कार्यालयाचे आभार व्यक्त केले.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply