Breaking News

खारघरमध्ये रस्ते सुरक्षा कार्यशाळा

पनवेल ः वार्ताहर

पर्यावरण शिक्षण केंद्र, पुणे व परिसर संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने खारघर युवा सेंटर येथे रस्ते सुरक्षा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या कार्यक्रमाला पनवेल महानगरपालिकेचे उपमहापौर विक्रांत पाटील, प्रादेशिक परिवहन महामंडळ अधिकारी शशिकांत तिरसे, मानवी प्रतिबंधक कक्षाचे प्रमुख अर्जुन गरड, वपोनि. वाहतूक शाखा खारघर आनंद चव्हाण, नगरसेविका लिना गरड, राजश्री कदम, प्रा. बी. ए. पाटील, पर्यावरणतज्ज्ञ प्राध्यापक हेमंत धायगुडे, महेशकुमार राऊत, राजू नायक, उदय पाटील, गणेश पाटील, किरण मोरे, बबनराव पवार, संदीप गायकवाड, शर्मिला देव आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी रस्ते सुरक्षा या विषयावर विस्तृत चर्चा करण्यात आली. प्रादेशिक परिवहन महामंडळ अधिकारी शशिकांत तिरसे यांनी सांगितले की, सर्व वाहनचालकांनी वाहने चालविताना रस्त्याच्या नियमांचे पालन करावे. तसेच मानवी प्रतिबंधक कक्षाचे वपोनि. अर्जुन गरड यांनी वाहन सुरक्षा कायदा 2019 याची अंमलबजावणी प्राधान्याने होईल, असे आवाहन केले.

वपोनि. खारघर वाहतूक विभाग आनंद चव्हाण यांनी सांगितले की, अशा प्रकारच्या कार्यशाळेचे आयोजन जास्तीत जास्त करून सर्व समाजामध्ये रस्ते सुरक्षा या विषयावर प्राधान्याने जनजागृती मोहीम हाती घ्यावी लागेल.

या कार्यक्रमासाठी पर्यावरण शिक्षण केंद्र पुणे यांच्याकडून अमर करण, प्रकल्प अधिकारी कुणाल जैस्वाल, परिसर संस्था पुणे यांच्यातर्फे रणजित गाडगीळ, संदीप गायकवाड, शर्मिला देव यांनी या रस्ते सुरक्षा कार्यशाळेसाठी मोलाचे मार्गदर्शन केले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply