उरण ः वार्ताहर
दत्त जयंतीनिमित्ताने उरण तालुक्यातील म्हातवली ग्रामपंचायत हद्दीतील नवे पोपुड येथील दत्तवाडी येथील दत्त मंदिरास आमदार महेश बालदी यांनी भेट देऊन दर्शन घेतले. या वेळी ओम दत्त ठाकूर महाराज ट्रस्टचे ठाकूर महाराज यांचे सुपुत्र निनाद ठाकूर व ओम दत्त ठाकूर, महाराज ट्रस्टचे ट्रस्टी तथा माजी उपनगराध्यक्ष रमेश ठाकूर यांनी आमदार महेश बालदी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सोबत भाजपचे उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, भाजपचे उरण शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शहा, भक्तगण, नवेपोपुड ग्रामस्थ आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.