Monday , February 6 2023

सीकेटी महाविद्यालयात विद्यार्थिनींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण

पनवेल ः रामप्रहर वृत्त

नवीन पनवेल, खांदा कॉलनी येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील महिला विकास कक्षातर्फे विद्यार्थिनींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे मंगळवारी

(दि. 10) आयोजन करण्यात आले होते. शिरीष तळेकर (“Goju Ryu- Japan Karate-Do Keibukai India”) आणि त्यांचे सहकारी यांनी आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणात 230 विद्यार्थिनींनी उपस्थिती दर्शविली. या वेळी महिला विकास कक्षाच्या प्रमुख डॉ. रत्नप्रभा म्हात्रे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. शेवटी या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन माधुरी अहिरे या विद्यार्थी प्रतिनिधीने केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महिला विकास कक्षाच्या सदस्या पूजा धांडगे, नीलिमा तिदार यांनी विशेष परिश्रम घेतले. हे प्रशिक्षण यशस्वी करणार्‍यांचे माजी खासदार व जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर, संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य आमदार प्रशांत ठाकूर, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. वसंत बर्‍हाटे, उपप्राचार्य डॉ. एस. के. पाटील यांनी कौतुक केले.

Check Also

कर्जतमधील रायगड जिल्हा बँकेची शाखा जळून खाक

कर्जत : प्रतिनिधी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास आग …

Leave a Reply