भाजपचे अजय बहिरा यांच्या पाठपुराव्याला यश
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक अजय बहिरा यांच्या पाठपुराव्यामुळे नांदगाव-भिंगारी गावातील गणपती विसर्जन घाटाच्या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामास महापालिकेमार्फत सुरुवात झाली आहे.
नांदगाव-भिंगारी रस्ता हा अरुंद असल्याने नागरिकांना तेथुन दुचाकी व चारचाकी वाहनांना तेथून ये-जा करण्यास समस्या उद्भवत होत्या. तसेच या रस्त्यावर अनेक ठिकाणांवर खड्डे पडून रस्त्यांचे विद्रुपिकरण झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होत आहे. या रस्त्याचे पनवेल महापालिकेमार्फत रुंदीकरण केल्यास तेथुन प्रभागातील तसेच नांदगाव व भिंगारी गावातील नागरीकांना ये-जा करणे सोयीचे होईल.
या विषयाचे महत्त्व लक्षात घेऊन पनवेल महापालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक मधील नांदगाव-भिंगारी गावातील गणपती विसर्जन घाटापर्यंत असलेल्या रस्त्याच्या रुंदीकरणाबाबत पनवेल महापालिका प्रशासनाकडून योग्यती उपाययोजना करण्याकरीता आपल्या पनवेल महापालिकेच्या संबंधित विभागाच्या अधिकारी वर्गाला आदेशित करावे.
पनवेल महापालिका हद्दीतील प्रभाग 1 मधील सर्व अंतर्गत रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय स्वरुपाची झाली असुन, या रस्त्यावर छोटे मोठे खड्डे पडल्याने रस्त्यावरून नागरीकांना ये-जा करताना मोठ्या प्रमाणात नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे प्रभागातील नागरिकांना प्रवास करण्यास अडथळा निर्माण होत आहे. विषयाचे गांभिर्य लक्षात घेता पनवेल महापालिका हद्दीतील प्रभाग 1 मधील सर्व अंतर्गत रस्त्यांची मान्सूननंतर तत्काळ दुरुस्ती (डागडूजी) करण्याकरीता आपल्या संबंधित विभागाच्या अधिकारी वर्गाला आदेशित करावे, असे बहिरा यांनी संबंधित प्रशासनाला दिलेल्या निवेदनामध्ये नमूद केले होते.