Breaking News

राहुल गांधी माफी मागा!

’रेप इन इंडिया’वरून भाजप आक्रमक; माफी मागण्याची संसदेत मागणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी ’रेप इन इंडिया’ संबोधत बलात्काराबाबत केलेल्या वक्तव्यावरून शुक्रवारी (दि. 13) लोकसभेत गदारोळ झाला. भाजपच्या महिला खासदार स्मृती इराणी, लॉकेट चॅटर्जी आणि इतर खासदारांनी राहुल यांच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त करीत राहुल गांधी यांना घेरले. आपल्या वक्तव्याबद्दल राहुल यांनी माफी मागावी, अशी जोरदार मागणी या वेळी करण्यात आली.

राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावरून शुक्रवारी भाजप खासदारांनी लोकसभा दणाणून सोडली. राहुल यांच्यामुळे देशाची मान खाली गेली आहे. त्यांनी महिलांचा अपमान केला आहे. या वक्तव्याबद्दल त्यांनी संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी भाजपने केली.

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांचे विधान अतिशय मन दुखावणारे असल्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह लोकसभेत म्हणाले. माझा राहुल यांच्याशी कोणतेही वैयक्तिक वैर नाही, पण त्यांच्या या विधानाने मला दु:ख झाले आहे, तसेच संपूर्ण सभागृहालाच यामुळे दु:ख झाले आहे. यामुळे राहुल यांना सभागृहात राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. या वक्तव्याबद्दल त्यांना माफी मागावी लागेल, असेही सिंह यांनी म्हटले.

राजनाथ सिंह यांचे बोलणे सुरू असतानाच राहुल गांधी लोकसभेत पोहोचले आणि आपल्या आसनावर बसले. त्यानंतर गदारोळामुळे लोकसभा अध्यक्षांनी सभेचे कामकाज तहकूब केले.

दरम्यान, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मात्र आपण माफी मागणार नसल्याचे म्हटले आहे. त्यांच्या या मग्रूर भूमिकेबद्दल टीका व संताप व्यक्त होत आहे.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply