Tuesday , February 7 2023

खोपोलीच्या स्नेहल जोगळेकर ठरल्या ‘मिसेस महाराष्ट्र’

खोपोली : प्रतिनिधी

दिवा पॅजन्टच्या वतीने घेण्यात आलेल्या मिसेस महाराष्ट्र इम्प्रेस 2019 या स्पर्धेत खोपोलीच्या स्नेहल जोगळेकर यांनी मिसेस कॉन्फिडन्ट व मिसेस महाराष्ट्र हे मानाचे किताब पटकावले. दिवा पॅजन्ट संस्थेतर्फे 5  ते 8 डिसेंबर या कालावधीत ग्रँड हयात या पंचतारांकित हॉटेलमध्ये मिसेस महाराष्ट्र इम्प्रेस 2019 ही स्पर्धा घेण्यात आली. संपूर्ण राज्यातून या स्पर्धेत मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी झाले होते. आघाडीचे अभिनेते गुलशन ग्रोव्हर, अभिनेत्री झोया अफरोज आणि वर्षा उसगावकर यांनी या स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले. खोपोलीच्या स्नेहल जोगळेकर या मिसेस कॉन्फिडन्ट व मिसेस महाराष्ट्र किताबाच्या मानकरी ठरल्या. त्यांना पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलचे वरिष्ठ डॉ. आकाश शाह यांच्या हस्ते हा  मानाचा किताब प्रदान करण्यात आला.

Check Also

भाजप नेते संजय भगत यांच्या वाढदिवसानिमित्त धान्यवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप माथाडी ट्रान्सपोर्ट व सिक्युरिटी आणि महाराष्ट्र जनरल कामगार संघटना उपाध्यक्ष …

Leave a Reply