Tuesday , February 7 2023

‘एक देश, एक रेशन कार्ड’

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

देशभरात ’वन नेशन, वन इलेक्शन’ची चर्चा रंगलेली असताना आता ’एक देश, एक रेशन कार्ड’ मोहीम राबवणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी दिली आहे. येत्या 1 जूनपासून देशात ही मोहीम राबविणार असल्याचे पासवान यांनी म्हटले आहे. या मोहिमेचा कामगार, व दुर्बल घटकातील लोकांना फायदा होणार असून, या कार्ड अंतर्गत देशातील कोणत्याही भागातून रेशन दुकानातून खाद्य सामान घेता येऊ शकणार आहे.

केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी मंगळवारी (दि. 2) लोकसभेत याबाबत माहिती दिली. ही सुविधा ई-पीओएस मशीनवर बायोमॅट्रिक आधारवर अवलंबून असून, ती संपूर्ण देशभरात 1 जूनपासून सुरू होणार आहे. केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी मंगळवारी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली. सध्या रेशन कार्डसाठी 14 राज्यांत पॉश मशीनची सुविधा सुरू करण्यात आली आहे, तसेच लवकरच 20 राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे. पुढील 1 जूनपासून एक राष्ट्र, एक रेशन कार्ड सुरू करण्याचे सरकारचे लक्ष्य असल्याचे पासवान म्हणाले.

Check Also

भाजप नेते संजय भगत यांच्या वाढदिवसानिमित्त धान्यवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप माथाडी ट्रान्सपोर्ट व सिक्युरिटी आणि महाराष्ट्र जनरल कामगार संघटना उपाध्यक्ष …

Leave a Reply