Breaking News

मावरीक इव्हेंटमध्ये कर्जतचे विद्यार्थी अव्वल

कर्जत : बातमीदार

महात्मा एज्युकेशन ट्रस्टच्या रसायनी येथील पिल्ले विद्यालयाच्या विद्या संकुलात आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय मावरीक इव्हेंटमध्ये रायगड जिल्ह्यातील शंभरहून अधिक माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रतिकृती सादर केल्या होत्या. त्यात कर्जत एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मीडियम स्कूलने पहिला क्रमांक पटकावला. कर्जत इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी भार्गव घोडविंदे, सिद्धी बडेकर आणि दर्शन पालकर यांनी मावरीक इव्हेंटमध्ये हवा शुद्धिकरण यंत्राची प्रतिकृती मांडली होती. या प्रतिकृतीला प्रथम क्रमांक मिळाला आहे. या यशाबद्दल कर्जत इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांना महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एस. लता यांच्या हस्ते ट्रॉफी, प्रशस्तिपत्रक आणि आठ हजार रुपयांचे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी पिल्ले शाळेच्या मुख्याध्यापिका मधुमीता चॅटर्जीदेखील उपस्थित होत्या.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply