Breaking News

भाजप पनवेल तालुकाध्यक्षपदी अरुणशेठ भगत, तर शहराध्यक्षपदी जयंत पगडे यांची फेरनिवड

पनवेल : रामप्रहर वृत्त

भारतीय जनता पक्षाच्या पनवेल तालुका मंडल अध्यक्षपदी अरुणशेठ भगत, तर शहर अध्यक्षपदी जयंत पगडे यांची सर्वानुमते फेरनिवड झाली आहे. या दोन्ही नेत्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

भाजपची संघटनात्मक निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. दर तीन वर्षांनी या निवडणुका होत असतात. त्या अनुषंगाने पनवेल तालुका मंडल व शहर मंडल यांच्या अध्यक्षांची निवडणूक शनिवारी (दि. 14) मार्केट यार्ड येथे झाली. भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, ज्येष्ठ नेते बाळासाहेब पाटील, रायगड जिल्हा निवडणूक सहप्रमुख वाय. टी. देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवडणूक झाली.

निवडणुकीच्या नियमानुसार तालुकाध्यक्ष पदासाठी अरुणशेठ भगत यांनी आपला उमेदवारी अर्ज तालुका निवडणूक अधिकारी दीपक बेहेरे यांच्याकडे, तर शहर अध्यक्ष पदाकरिता जयंत पगडे यांनी आपला उमेदवारी अर्ज शहर निवडणूक अधिकारी राजेश भगत यांच्याकडे

दाखल केला. या निवडणूक प्रक्रियेत प्रत्येकी एकच अर्ज आल्याने तालुकाध्यक्षपदी अरुणशेठ भगत आणि शहराध्यक्ष म्हणून जयंत पगडे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. भगत आणि पगडे यांनी गेल्या चार वर्षांत केलेले संघटनात्मक काम उल्लेखनीय असल्याने पुन्हा एकदा त्यांना अध्यक्षपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी मिळाली आहे.

या वेळी महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर विक्रांत पाटील, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, एकनाथ भोपी, सरचिटणीस अविनाश कोळी, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष रत्नप्रभा घरत, राज्य परिषद सदस्य विनोद साबळे, सी. सी. भगत, सुभाष पाटील, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, दशरथ म्हात्रे, शहर सरचिटणीस नितीन पाटील, अमरीश मोकल, यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, बूथ अध्यक्ष, सक्रिय सदस्य उपस्थित होते. उपस्थितांनी दोन्ही नेत्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Check Also

शिवाजीनगर क्रिकेट अकॅडमी साता समुद्रापार -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त शिवाजीनगर क्रिकेट अकॅडमी नाव हे साता समुद्रापार पोहचले असून या सुसज्ज …

Leave a Reply