Breaking News

मराठी पत्रकारिता वर्गाची प्रवेश प्रक्रिया सुरू

मुंबई : प्रतिनिधी

मुंबई विद्यापीठाच्या गरवारे व्यावसायिक प्रशिक्षण संस्थेतर्फे माध्यम व्यवस्थापन हा एक वर्ष कालावधीचा पत्रकारितेचा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम (PGDMM) मराठी, हिंदी आणि इंग्रजी माध्यमातून चालविला जातो. कोणत्याही शाखेचे पदवीधर या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी पात्र असतील. मराठी पत्रकारिता वर्गात अत्यंत अनुभवी पत्रकारांकडून मार्गदर्शन केले जाते.

पत्रकारितेचे साकल्याने ज्ञान देण्याबरोबरच कार्यानुभव, प्रोजेक्ट, फील्ड रिपोर्टिंग, ग्रुप डिस्कशन, सेमिनार इत्यादी विविध उपक्रम आयोजित केले जातात. सन 2020-21 या शैक्षणिक वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांसाठी पत्रकारिता वर्गाचे प्रवेश परीक्षेसाठीचे ऑनलाइन फॉर्म संस्थेच्या www.gicededu.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. या वर्गासाठी नावनोंदणी करण्याची अंतिम मुदत 1 डिसेंबर असून, या वर्गाची बहुपर्यायी पद्धतीची प्रवेश परीक्षा शुक्रवार (दि. 4 डिसेंबर) सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आली आहे.

या परीक्षेनंतर त्याचदिवशी तोंडी परीक्षा घेण्यात येईल. नावनोंदणी करणार्‍या विद्यार्थ्यांना या परीक्षेची लिंक ई-मेल द्वारे  पाठविण्यात येईल. पत्रकारिता क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असणार्‍या सर्वांनी त्वरेने या संकेत स्थळाला भेट देऊन ऑनलाइन फॉर्म भरून द्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.

अधिक माहितीसाठी खालील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. (मराठी पत्रकारिता वर्गासाठी संपर्क-श्रीमती नीला उपाध्ये-022-25221686, नम्रता कडू-7977489076) (हिंदी पत्रकारिता वर्गासाठी संपर्क-सय्यद सलमान-98210 10098) (गरवारे कार्यालय संपर्क क्रमांक-9987395457)

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply