Breaking News

पनवेल मिनीथॉनमध्ये 1300 विद्यार्थ्यांचा सहभाग

पनवेल : रामप्रहर वृत्त
स्वच्छ भारत अभियानांतर्गत पनवेल महापालिकेमध्ये स्वच्छ सर्वेक्षण 2020 प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने महापालिकेमार्फत इन्फिनिटी फाऊंडेशन आणि आयएनआयएफडी यांच्या संयुक्त विद्यमाने रन फॉर पोलूशन फ्री सिटी (प्रदूषणमुक्त शहरासाठी दौड) शनिवारी (दि. 14) खांदा कॉलनी येथे आयोजित करण्यात आली होती. या मॅरेथॉनला आमदार प्रशांत ठाकूर यांनी झेंडा दाखविला.
या उपक्रमाला नगरसेविका राजश्री वावेकर, सहाय्यक आयुक्त शाम पोशेट्टी, स्वच्छ भारत अभियानाच्या वरिष्ठ सल्लागार मधुप्रिया आवटे,  आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड, दौलत शिंदे व इतर अधिकारी, आयएनआयएफचे सुरिंदर सिंग, उद्योजक राजेंद्र कोलकर, महाराष्ट्र बिल्डर असोसिएशनचे लक्ष्मण साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या स्पर्धेत सुमारे 1300हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. पिल्लईस कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, पिल्लईस कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स, एमजीएम कॉलेज, आयटीएम कॉलेज, सीकेटी कॉलेज, केएलई कॉलेजमधील विद्यार्थ्यांसह राज अकादमी, गुड मॉर्निंग क्लबच्या सदस्यांनी दौड लगावली. यात 66 वर्षांच्या ज्येष्ठ नागरिक पार्वती मोरे आकर्षण ठरल्या. मान्यवरांच्या भाषणाने व मार्गदर्शनाने सांगता झाली. कोलकर ग्रुपचे विशेष सहकार्य लाभले.

Check Also

संकट काळात ठाकूर कुटुंबियांनी केलेली मदत जनता विसरणार नाही -जरीना शेख

पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या संकट काळात लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांतदादा ठाकूर, परेशदादा ठाकूर …

Leave a Reply