Breaking News

खारघरच्या सुखविंदर कौर कांग यांना किताब

‘मिसेस इंडिया रेवशिंग अ‍ॅण्ड मिसेस इंडिया पॉप्युलर 2019’च्या मानकरी

पनवेल ः रामप्रहर वृत्त

खारघर येथील सुखविंदर कौर कांग यांनी ’मिसेस इंडिया इंटरनॅशनल जिओ किंग आणि क्वीन 2019’ या नामांकित स्पर्धेतील ’मिसेस इंडिया रेवशिंग अ‍ॅण्ड मिसेस इंडिया पॉप्युलर 2019’ किताब पटकाविला आहे.

ही स्पर्धा 14 डिसेंबर रोजी कोलकाता येथे आयोजित करण्यात आली होती. बॉलीवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता अरबाज खान या स्पर्धेतील परीक्षक होता. स्पर्धेत 32 स्पर्धकांचा सहभाग होता. स्पर्धेची सेमीफायनल दुबई येथे झाली. त्या ठिकाणी टॅलेंट राऊंडसह पंजाबी आणि बेली डान्सचे सुंदर फ्यूजन डान्स मिक्स सादर केले. एकूणच केलेल्या सादरीकरणातून त्यांची फिनालेसाठी निवड झाली. सुखविंदर कौर कांग यांचे पती मर्चंट नेव्हीमध्ये अधिकारी म्हणून कार्यरत असून, त्यांना एक वर्षाची मुलगी आहे.

सुखविंदर फॅशनप्रिय, स्टाईल प्रतीक, फॅशन ब्लॉगर आणि निसर्गप्रेमी आहेत. लिझा वर्मा त्यांच्या मार्गदर्शक होत्या. मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर, ऐश्वर्या राय-बच्चन आणि इतर बर्‍याच ब्युटी पेजंट विजेत्यांच्या त्या मार्गदर्शक आहेत. त्यांचा पाठिंबा आणि मार्गदर्शन मिळाल्याने खूप आनंददायी वाटले, असे सुखविंदर यांनी सांगितले.

जीओ किंग आणि क्वीन यांनी मला माझे कौशल्य, सौंदर्य व मत व्यक्त करण्यासाठी एक व्यासपीठ दिल्याबद्दल त्यांचे धन्यवाद. हा माझ्या आयुष्यातील एक अभिमानाचा क्षण आणि आगामी बर्‍याच गोष्टींचा प्रारंभ आहे.

-सुखविंदर कौर कांग

Check Also

शेकाप माजी नगरसेवक सुनील बहिराचा भाचा रूपेश पगडेच्याही मुसक्या पोलिसांनी आवळल्या

महिलांना जबरी मारहाण व दमदाटी भोवली पनवेल : रामप्रहर वृत्त बांधकाम मटेरियल सप्लायवरून वाद करीत …

Leave a Reply