Breaking News

विचुंबे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपचे रवींद्र भोईर बिनविरोध

पनवेल : रामप्रहर वृत्त

विचुंबे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपचे रवींद्र रामदास भोईर यांची बिनविरोध निवड झाली असून, त्याबद्दल त्यांचे अनेकांनी अभिनंदन केले.

किशोर सुरते यांनी ठरल्यानुसार राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी निवडणूक झाली. यामध्ये रवींद्र भोईर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. त्याबद्दल भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, प्रभाग समिती ‘ड’ अध्यक्ष तेजस कांडपिळे, नगरसेवक नितीन पाटील, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, विभागीय अध्यक्ष किशोर सुरते, अमरिश मोकल, विचुंबे गाव अध्यक्ष के. सी. पाटील, जगदीश वाघमारे, नितीन भोईर, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद भिंगारकर, राम म्हात्रे, अनिल भोईर, अनंता गायकवाड, राजेश पाटील, सुनील पाटील, गणेश भिंगारकर, विवेक भोईर, नयन भोईर, डी. के. भोईर, माजी सरपंच अमिता म्हात्रे, संगीता भोईर, नविता भोईर, अक्षता गायकवाड, संगीता भिंगारकर, अनिता भगत यांच्यासह कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.

Check Also

नवी मुंबई विमानतळाला ‌‘दिबां‌’चे नाव द्या; भाजपचे लक्षवेधी आंदोलन

पनवेल : रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्व. दि.बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी …

Leave a Reply