Breaking News

प्रो कबड्डी लीगमध्ये दिल्लीची ‘दबंगगिरी’

गतविजेत्या बंगाल वॉरियर्सला लोळवले

बंगळुरू ः वृत्तसंस्था

प्रो कबड्डी लीगमध्ये बुधवारी दोन सामने झाले. पहिल्या सामन्यात दिल्ली दबंगने बंगाल वॉरियर्सला एकतर्फी लोळवले, तर दुसर्‍या सामन्यात यूपी योद्धा आणि गुजरात जायंट्स यांच्यातील सामना बरोबरीत सुटला. दिल्लीने तिसरा विजय मिळवत यंदाच्या हंगामात अजिंक्य राहाण्याची मालिका कायम ठेवत अव्वल स्थानी झेप घेतली, तर यूपी योद्धाशी सामना बरोबरीत सोडवून गुजरात जायंट्सचा संघही दुसर्‍या क्रमांकावर विराजमान झाला.

दोन विजय आणि एक टाय असा प्रवास करून दिल्लीचा संघ बुधवारी गतविजेत्या बंगाल वॉरियर्ससमोर उभा ठाकला होता. आपला विजयरथ वेगाने पुढे नेत त्यांनी आक्रमक सुरुवात केली. झटपट गुण मिळवत त्यांनी बघताबघता सामन्यावर पकड मिळवली. हाफ टाईमपर्यंत दिल्लीने 33-15 अशी आघाडी घेतली होती. उत्तरार्धातही त्यांनी तुफान चढाई केली आणि 52-35 असा एकतर्फी विजय मिळवला. नवीन कुमारने एकट्याने 21 रेड पॉईंट्ससह 24 गुण मिळवत विजयात सिंहाचा वाटा उचलला.

पहिला सामना एकतर्फी झाला असला तरी गुजरात आणि यूपी योद्धा यांच्यातील सामना चांगलाच रंगतदार झाला. पू्वार्धापासून ते उत्तरार्धाच्या शेवटापर्यंत सामन्यात गुणांचा फरक फारसा दिसून आला नाही. कधी गुजरात पुढे, तर कधी यूपी योद्धा पुढे हा सामना रंगला, मात्र अखेरीस दोन्ही संघ 32-32 अशा गुणांवर राहिले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply