Breaking News

कळंबोलीच्या भाजप कार्यालयामध्ये लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती साजरी

कळंबोली : प्रतिनिधी

भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते बहुजन समाजाचे आधारस्तंभ स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची 71वी जयंती कळंबोली येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये साजरी करण्यात आली. या वेळी भाजप कळंबोली शहर अध्यक्ष रवीनाथ पाटील,  भटके-विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष बबन बारगजे, ज्येष्ठ नेते अशोक मोटे, प्रभाग 8चे अध्यक्ष प्रकाश शेलार, भटके-विमुक्त आघाडीचे कळंबोली मंडल अध्यक्ष आबा घुटुकडे, सरचिटणीस रंगनाथ खेडकर, युवा नेते श्रीकांत ठाकूर, जिल्हा चिटणीस रमेश नायर, जमीर शेख, विलास किडे, सुनील खाडे, दत्ताभाऊ बिनवडे, सतीश गरजे, सुभाष बडे, बायजा बारगजे, दुर्गा सहानी, नीता अधिकारी व युवा मोर्चाचे मंडल अध्यक्ष गोविंदा आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे हे भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी व नेत्यांसाठी एक मार्गदर्शक व संघर्ष योद्धा म्हणून राहिले आहेत. त्यांच्या जाण्याने बहुजन समाजाची मोठी हानी झाली. त्यांच्या जन्मदिनी त्यांच्या कार्याची आठवण करून व त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन भाजप तळागाळातील लोकांपर्यंत पोहचण्यासाठी प्रत्येकांनी काम केले पाहिजे, असे बबन बारगजे यांनी या वेळी मनोगत व्यक्त करताना सांगितले.

Check Also

खोपोली येथील विविध समाज घटकांतील कार्यकर्ते भाजपमध्ये

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती खोपोली : प्रतिनिधीभाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस तथा पनवेलचे कार्यसम्राट …

Leave a Reply