Breaking News

खंडणी प्रकरणात उद्धव ठाकरेंचा हात

नवनीत राणांचा लोकसभेत गंभीर आरोप

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या पत्रामुळे राज्यात खळबळ माजली असताना लोकसभेतही त्याचे पडसाद उमटले आहेत. या प्रकरणी अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत गंभीर आरोप केला आहे. खंडणी प्रकरणात मुख्यमंत्र्यांचाही हात असल्याचा आरोप राणा यांनी केला आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ आढळलेल्या स्फोटकांच्या प्रकरणात अटक करण्यात आलेले निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना दरमहा 100 कोटींची हप्तेवसुली करण्यास गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितल्याचा आरोप परमबीर सिंह यांनी केला आहे. यावर बोलताना खासदार नवनीत राणा म्हणाल्या, माझे सहकारी महाराष्ट्रात खंडणी वसुली करण्याचे काम सुरू आहे सांगत आहेत. त्यावरून मी सांगू इच्छिते की, जो व्यक्ती 16 वर्ष निलंबित होता, सात दिवस जेलमध्ये राहिला त्याला कोणत्या आधारे पुन्हा सेवेत घेतले. जेव्हा भाजपचे सरकार होते तेव्हा उद्धव ठाकरेंनी सचिन वाझेंना पुन्हा सेवेत घेण्यास सांगितले होते. फडणवीसांनी यासाठी स्पष्ट नकार दिला होता. ज्या दिवशी ठाकरे सरकार आले तेव्हा परमबीर सिंह यांना फोन करून सर्वांत आधी सचिन वाझेंना सेवेत घेतले. सचिन वाझेंमुळे परमबीर सिंह यांची बदली करण्यात आली.
‘माझी विनंती आहे की, ज्या प्रकारे इतर आरोपांवर लागले आहेत, मला सांगायचे आहे की महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरूनच हे सगळे सुरू आहे. बदल्या करणे, खंडणी वसूल करणे यामध्ये इतर कोणीही सहभागी नाही. एकट्या मुंबईतून महिन्याला 100 कोटी वसुली होत असेल तर संपूर्ण महाराष्ट्रातून किती होत असेल?, अशी विचारणा नवनीत राणा यांनी या वेळी केली.
दरम्यान, भाजप खासदार गिरीश बापट यांनी लोकसभेत बोलताना महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी केली.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply