पनवेल : वार्ताहर
सह्याद्री इन्टिट्यूटच्या कामोठे येथील डॉल्फिन किड्स प्री प्रायमरी स्कूलच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेस बच्चेकंपनीचा प्रतिसाद लाभला.
पूर्व प्राथमिक वयोगटातील मुलांच्या शारीरिक क्षमतेनुसार स्पर्धेचे
नियोजन करण्यात आले होते. खो-खो, धावणे, लांब उडी, चमचा गोटी, गायन आदींमध्ये विद्यार्थ्यांची आवड दिसून आली. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
सातदिवसीय क्रीडा स्पर्धेतील लहानग्यांचे कसब पाहण्यासाठी पालकवर्ग आणि परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. संस्थेचे अध्यक्ष प्रज्ञावंत कुरणे व उपाध्यक्ष उदय मोहोड यांनी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी स्कूलच्या प्राचार्य चित्रा महामुनी आणि कर्मचार्यांचे अभिनंदन केले, तर प्राचार्यांनी सर्व सहभागी मुलांचे कौतुक केले.