पनवेल : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी कोविड प्रतिबंधक लसीकरणास प्रारंभ झाला.
या वेळी ‘रयत‘चे लाईफ मेंबर व समन्वय समिती सदस्य रवींद्र भोईर, प्रा. राजेंद्र चौधरी, प्रा. उमेश पाटील, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अस्मिता बोंबटकर, डॉ.आनंद शिंदे व डॉ. आरती गुप्ते, आरोग्य सहायक सुलभा खाडे, आरोग्य सेविका चंद्रकला आग्रावकर त्यांचे सहकारी कर्मचारी उपस्थित होते.
विद्यालयाच्या प्राचार्या साधना डोईफोडे ह्या विद्यालयातील 15 ते 18 या वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण तातडीने करवून घेण्यासाठी प्रयत्नशील असून त्या दृष्टीने आरोग्य विभागाशी समन्वय साधून आहेत. सोमवारी (दि. 10) इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. यादृष्टीने विद्यालयातील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या याद्या तयार करण्यात आल्या असल्याची माहिती विद्यालयाचे उपप्राचार्य जगन्नाथराव जाधव व पर्यवेक्षक दिपक भर्णुके यांनी दिली. या मोहिमेला आरोग्य विभागाचे विशेष सहकार्य लाभत आहे.