Breaking News

कोरोना नियंत्रणाबद्दल जागतिक आरोग्य संघटनेकडून भारताचे कौतुक

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
भारतात कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने घट होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आता जागतिक आरोग्य संघटनेनेही (डब्ल्यूएचओ) भारताचे कौतुक केले आहे. भारताने कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळविण्यात चांगली कामगिरी केल्याचे डब्ल्यूएचओचे महासंचालक डॉ. ट्रेडोस ए. घेब्रेयसिस यांनी म्हटले आहे.
या संदर्भात बोलताना ट्रेडोस म्हणाले, भारताने कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात उल्लेखनीय यश मिळविले आहे. यावरून आपल्याला लक्षात येते की, आपणही या सोप्या सार्वजनिक आरोग्याच्या उपाययोजना केल्या, तर कोरोना व्हायरसवर मात करू शकतो. लशीचा प्रभाव वाढल्यानंतर आपण आणखीही चांगल्या परिणामांची आशा करू शकतो.
दरम्यान, भारतात कोरोनाबाधित रुग्ण आढळत असले तरी, उपचाराधीन कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. हे प्रमाण आता 1.40 टक्क्यांवर आले आहे. या संसर्गातून एक कोटी चार लाख 96 हजार लोक बरे झाले असून, त्यांचे प्रमाण 97.16 टक्के आहे, तर कोरोना रुग्णांच्या मृत्यूदरात आणखी घट होऊन तो 1.43 टक्के झाला आहे.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply