Breaking News

माणगाव भाजप अध्यक्षपदी संजय ढवळे यांची बिनविरोध फेरनिवड

माणगाव : प्रतिनिधी

भारतीय जनता पक्षाच्या माणगाव तालुका अध्यक्षपदी संजयआप्पा ढवळे यांची शुक्रवारी (दि. 20) बिनविरोध फेरनिवड करण्यात आली.

भाजपची संघटनात्मक निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्याचा एक भाग म्हणून माणगाव तालुका भाजपची बैठक शुक्रवारी निवडणूक निर्णय अधिकारी रमेश मुंढे यांच्या अधिपत्याखाली   येथील खरे मंगल कार्यालयात घेण्यात आली. त्यात नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या वेळेत संजयआप्पा ढवळे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची भाजपच्या माणगाव तालुका अध्यक्षपदी बिनविरोध झाल्याचे रमेश मुंढे यांनी जाहीर  केले.

भाजपचे ज्येष्ठ नेते भालचंद्र महाले, माजी तालुका अध्यक्ष सुरेंद्र साळी, बाळशेठ घोणे, तालुका सरचिटणीस योगेश सुळे, चिन्मय मोने, अ‍ॅड. अनिकेत ठाकूर, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष अमित घाग, महिला मोर्चाच्या प्राजक्ता शुक्ला, तालुका अध्यक्षा यशोधरा गोडबोले, शहराध्यक्षा मेघा धुमाळ, कामगार आघाडी तालुका अध्यक्षा शर्मिला सत्वे, योगेश जाधव, राजीव मुंढे, गणेश भोनकर, योगेश पालकर, दिप्ती नकाशे, स्वाती पिंपळे, अश्विनी खरे, स्मिता भोईर, दीपाली जाधव, रंजना घाग, रजनी घाडगे यांच्यासह कार्यकर्ते यावेळी  मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी संजयआप्पा ढवळे यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. माणगाव तालुक्यात भाजप संघटना अधिकाधिक मजबूर करेन, अशी ग्वाही ढवळे यांनी

यावेळी दिली.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून मराठी अर्थशास्त्र परिषदेला 20 लाखांची देणगी

पनवेल : रामप्रहर वृत्त समाजाच्या हितासाठी अखंडपणे सामाजिक कार्य करणारे आणि कायम सामाजिक बांधिलकी जपणारे …

Leave a Reply