Breaking News

पंतप्रधान नरेंद्र मोदींना मातृशोक

हिराबेन यांचे निधन; पार्थिवावर गांधीनगरमध्ये अंत्यसंस्कार

गांधीनगर : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचे शुक्रवारी (दि. 30) पहाटे निधन झाले. आईच्या निधनानंतर पंतप्रधान मोदी गांधीनगरमध्ये दाखल झाले व त्यांनी पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर रुग्णवाहिकेमधून पार्थिव स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी नेताना पंतप्रधान मोदींनी रुग्णवाहिकेमधूनच प्रवास केला. तत्पूर्वी रुग्णवाहिकेपर्यंत पार्थिव नेताना त्यांनी पार्थिवाला खांदाही दिला.
जून महिन्यामध्ये वयाची शंभरी ओलांडलेल्या हिराबेन यांना अस्वस्थ वाटू लागल्याने 28 डिसेंबर रोजी यूएन मेहता रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. पंतप्रधान मोदी त्याच दिवशी आईला भेटण्यासाठी अहमदाबाद गेले होते. हिराबेन यांनी शुक्रवारी रात्री साडेतीनच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला.
एक तेजस्वी शतक ईश्वराच्या चरणी विलीन झाले, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी आईच्या मृत्यूबद्दलची माहिती दिली आहे. हिराबेन यांचा हातामध्ये दिवा घेऊन असलेला फोटो शेअर करीत, आईमध्ये मी कायमच त्या त्रिमूर्तीचा अनूभव घेतला ज्यात एक तपस्व्याची यात्रा, निष्काम कर्मयोग्याचे प्रतीक आणि मूल्य दिसून आली, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply