Wednesday , February 8 2023
Breaking News

‘थर्टी फर्स्ट’साठी एसटी, रेल्वेगाड्या झाल्या हाऊसफुल्ल

पेण ः प्रतिनिधी

डिसेंबर महिना ओसरताना सर्वांना वेध लागतात ते नववर्ष स्वागताचे. 25 डिसेंबरपासून शाळांना नाताळची सुटी लागल्यानंतर अनेकांना नववर्षाचे स्वागत करण्यासाठी बाहेर फिरायला जायची उत्सकता लागलेली असती. त्यामुळे अगोदरच  प्रवाशांनी गाड्यांची किंवा रेल्वेची बुकिंग करून ठेवल्याने या महिन्यात कोंकणात किंवा गोव्यासारख्या ठिकाणी जाणार्‍या प्रवाशांना तिकीट मिळेनासे झाले आहे.

मुंबईहून कोकणाकडे जाणार्‍या रेल्वेगाड्या सध्या फुल्ल असून यामध्ये जनशताब्दी, तुतारी एक्स्प्रेस, मंगळूर-मुंबई, मांडवी अशा अनेक गाड्या या मार्गावरून धावत असून अत्याधुनिक सुविधांनीयुक्त तेजस एक्स्प्रेस, डबल डेकर  एक्स्प्रेस या गाड्यांचेही कन्फर्म तिकीट मिळत नाही. दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटनस्थळांसह गोवा सफरीवर पर्यटक मोठ्या प्रमाणात जात असल्याने येथील हॉटेल, रिसॉर्टचे बुकिंगही फुल्ल झालेले असते. यासाठी ऐन वेळेस जाणार्‍या पर्यटकांना तिकीट मिळत नसल्याने जास्त भाडे मोजून खाजगी बससेवेचा आधार घ्यावा लागणार आहे, तसेच काहींना आपले सुटीत जाण्याचे स्थळही बदलावे लागणार आहे.

Check Also

लोकनेते दि. बा. पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण

पनवेल : वार्ताहर परमपूज्य स्वामी अक्षयानंद सरस्वती महाराज यांच्या प्रेरणेने अक्षयधाम मंदिराचा आठवा वर्धापन दिन …

Leave a Reply