Breaking News

पेण येथे एकांकिका स्पर्धेस प्रारंभ

पेण : प्रतिनिधी

येथील सन्मित्र ललित क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या कै. सुमित प्रवीण पाटील राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी ज्येष्ठ नाट्यकर्मी राजन भिसे यांच्या हस्ते झाले. नाट्यगृह हे रसिकांची भूक भागविण्याचे व विचारांची देवाणघेवाण करण्याचे साधन असल्याचे राजन भिसे यांनी या वेळी सांगितले.

एकांकिका स्पर्धा आयोजित करून सन्मित्र संस्था नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देत असल्याबाबत राजेश भिसे यांनी संस्थेचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नचिकेत घैसास यांनी केले. संस्थेचे कार्याध्यक्ष किरण देव यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply