Breaking News

‘स्वच्छ भारत’मध्ये कामगारांचा मोठा वाटा -पाटील

पेण : प्रतिनिधी

भारत स्वच्छता अभियाना अंतर्गत पेण नगर परिषदेने शहर स्वच्छतेबाबत चांगली कामगिरी बजावली असून, राज्याच्या मानांकनामध्ये स्वच्छतेबाबत पेण नगर परिषदेला 49वा मानांकन मिळाले आहे. या कामगिरीत सफाई कामगारांचा मोठा वाटा असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्षा प्रितम पाटील यांनी केले.  स्वच्छ भारत अभियानात सातत्य रहावे, या हेतुने राज्य शासनाने सफाई कर्मचार्‍यांचे प्रोत्साहन वाढविण्यासाठी त्यांचा  दर महिन्याला सत्कार करण्याचा निर्णय घेेतला आहे. या अनुशंघाने पेण नगर परिषदेतील सफाई कर्मचार्‍यांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. नगर परिषद सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात प्रीतम पाटील बोलत होत्या. येत्या नागरी स्वच्छ सर्वेक्षणात स्वच्छतेच्या बाबतीत 1 ते 10 क्रमांकाचे मानांकन पटकाविण्याचे नगर परिषद प्रशासनाचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.  या कार्यक्रमात रमेश राघो गायकवाड यांना जिवनगौरव पुरस्कार देवून तसेच सफाई कामगार आर. सतीराज यांना द्वितीय क्रमांक व आर्या सुब्रहमण्यम अर्जून यांना स्वच्छता मित्र पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. आरोग्य निरीक्षक दयानंद गावंड, आरोग्य विभाग शहर समन्वयक विशाल सकपाळ यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास उपनगराध्यक्ष दिपक गुरव, गटनेते अनिरूद्ध पाटील, सभापती शहेनाज मुजावर, नलिनी पवार, नगरसेवक प्रशांत ओक, नगरसेविका तेजस्विनी नेने, वसुधा पाटील, आनंदी जोशी, मुख्याधिकारी अर्चना दिवे यांच्यासह नगर परिषद कर्मचारी उपस्थित होते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply