पनवेल : रामप्रहर वृत्त
शासकीय अध्यापक महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2019 वर एकदिवसीय विभागीय परिसंवाद उत्साहात झाला. परिसंवादाची सुरुवात पाहुण्यांच्या हस्ते उदघाटनाने झाली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. सुविद्या सरवणकर यांनी केले. त्यात त्यांनी महाविद्यालयीन सर्वांगीण विकास उपक्रम याविषयी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पनवेलच्यो कोकाण विभागाचे विभागीय सहसंचालक डॉ.संजय जगताप हे होते. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. रमा भोसले होत्या. प्रथम सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून औरंगाबाद येथील प्राचार्य जवाहरलाल नेहरू महाविद्यालयाच्या डॉ. गणेश अग्निहोत्री, चेंबूर सर्वकष शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्रा. डॉ.चंद्रशेखर चक्रदेव हे होते. दुसर्या सत्रात पुणे येथील एसएनडीटी महाविद्यालयाचे माजी अधिव्याख्याते डॉ. दत्तात्रेय तापकीर, डॉ. केशर जाधव यांनी हे होते.
समारोप समारंभाचे प्रमुख पाहुणे पनवेल नगरपरिषदेचे माजी शिक्षणाधिकारी एस. एस. जाधव होते. तर अध्यक्षस्थानी नांदेडच्या शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.सुनंदा रोडगे होत्या. परिसंवादाची सांगता सहभागींना प्रशस्तिपत्र देऊन आणि वंदे मातरमने झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या व परिसंवादाच्या संयोजक डॉ.रमा भोसले व समन्वयक डॉ. सुविद्या सरवणकर, डॉ. सुनिता लोंढे, डॉ. प्रमोद जोशी, डॉ. नीलिमा मोरे, डॉ. रमेश भोसले, प्रा. संजीवनी पैठणकर आणि प्रथम, व्दितीय बी.एड्, एम.एड् वर्षाचे छात्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, शासकीय अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृहचे स्वयंसेवक आदींनी परिश्रम घेतले. या परिसंवादासाठी एकूण 225 शिक्षकांनी आपला सहभाग नोंदवला.