पनवेल : रामप्रहर वृत्त
खारघर येथील रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन गुरुवारी (दि.26)करण्यात आले होते. या प्रदर्शना मध्ये ’न्यू इंग्लिश स्कूल ओवेपेठ’ आणि रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालय, खारघर विद्यालय यांचा समावेश होता.
दोन्ही संस्थेच्या बहुसंख्य विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता. 35 प्रकल्प बनविण्यात आले होते. यात प्रामुख्याने रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, गणित, संगणक इ. विषयांना अनुसरून वेगवेगळे प्रकल्प बनविले होते. विद्यार्थ्याना प्राचार्य म्हात्रे सर यांचे मार्गदर्शन लाभले.
गुरुवारी असलेले ’कंकणाकृती सुर्यग्रहण’ हा खगोलीय आविष्कार पाहण्याची सुवर्ण संधी प्राचार्य म्हात्रे सर यांनी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली होती. या कार्यक्रमा करिता माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, कार्यकारिणी मंडळ सदस्य आमदार प्रशांत ठाकूर, ज. भ. शि. प्र. संस्थेचे सचिव डॉ. गडदे यांनी या वैज्ञानिक प्रदर्शनासाठी व खगोलिय ग्रहण पाहण्यासाठी विद्यार्थ्याना शुभेच्छा दिल्या.