पोलादपूर : प्रतिनिधी
पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावर रानबाजिरे येथे खराब रस्त्यामुळे दुचाकीस्वार दोन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. एसटी बसखाली दुचाकी येऊन गुरुवारी (दि. 27) रात्री आठच्या सुमारास हा अपघात झाला.
अरुण अशोक गोळे (रा. चांभारगणी, ता. पोलादपूर) आणि संदीप नाना ढेबे (रा. तुटवली, ता. पोलादपूर) अशी मृत दुचाकीस्वारांची नावे आहेत. त्यांची दुचाकी (एमएच 06 सीवाय 2340) खडीवरून घसरल्याने अक्कलकोट-महाड एसटी बस (एमएच 20 बीएल 1571)खाली आली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर रस्त्याच्या दुरवस्थेबाबत कापडे परिसरात ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलादपूर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.
Check Also
भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …