पनवेल : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या, चांगू काना ठाकूर विद्यालयातील मराठी पूर्व प्राथमिक व पूर्व प्राथमिक विभागाच्या वतीने आजी-आजोबांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजी-आजोबा दिन शुक्रवारी (दि.27) साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमांतर्गत उपस्थित आजी-आजोबांमधून चिठ्ठया काढून आजोबा चंद्रकांत धनावडे व आजी उर्मिला शेटे यांची व्यासपीठावर आजी-आजोबांचे प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली तसेच व्यासपिठावर प्रमुख अतिथी म्हणूनआत्माराम पाटोळे वसरला पाटोळे उपस्थित होते. तसेच माध्यमिक व उच्चमाध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका इंदूताई घरत, प्राथमिक विभाग इंग्रजी माध्यम मुख्याध्यापिका उज्वला कोटियन, पूर्व प्राथमिक विभाग इंग्रजी माध्यम पर्यवेक्षिका संध्या अय्यर, मुख्याध्यापक सुभाष मानकर, शिक्षक, पालक संघाचे सदस्य उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन व श्रीफळ वाढवून उदघाटन करण्यात आले. उपस्थित मान्यवर व सर्व आजी-आजोबांचे शिक्षकवृदांनी व विद्यार्थ्यांनी गुलाबपुष्प व खाऊ देऊन स्वागत केले. या कार्यक्रमादरम्यान शालेय स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा व सांस्कृतिक कार्यक्रम झाला. मान्यवरांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचे पारितोषिक देऊन कौतुक करण्यात आले.कार्यक्रमाच्या शेवटी आजोबा बळीराम कदम (वावंढळ गाव) यांनी आपले मनोगत व्यक्त केले.