उरण : वार्ताहर
गोवठणे येथे प्रशांत स्पोर्ट्सचे संचालक मनोज अशोक पाटील यांच्या सौजन्याने मर्यादित षटकांची दोनदिवसीय क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, या स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर यांच्या हस्ते शनिवारी (दि. 28) झाले.
या वेळी भाजपचे उरण तालुका सरचिटणीस सुनील पाटील, युवा अध्यक्ष सुरज म्हात्रे, संतोष वर्तक, रवी म्हात्रे, निलेश म्हात्रे, गोवठणे ग्रामपंचायत सदस्य प्राची पाटील, मनोज पाटील, सदस्य संतोष वर्तक, विश्रांती म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ता हर्षद म्हात्रे, रोशन म्हात्रे, राणी म्हात्रे, प्रेम पाटील आदी उपस्थित होते.
स्पर्धेसाठी श्री गणेश क्रिकेट क्लब, स्टार बॉईज, नयन स्पोर्ट्स, विघ्नहर्ता गणेश मित्र मंडळ आदींचे सहकार्य मिळत आहे.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …